'दिखावे पे मत जाओ; अपनी अक्कल लगाओ', शिवेंद्रराजे यांचा उदयनराजेंवर निशाणा

‘दिखावे पे मत जाओ; अपनी अक्कल लगाओ’, शिवेंद्रराजे यांचा उदयनराजेंवर निशाणा

| Updated on: Mar 27, 2023 | 4:05 PM

VIDEO | आमदार शिवेंदद्रराजे यांनी डायलॉगबाजी करत खासदार उदयनराजे यांच्यावर केली जोरदार टीका

सातारा : साताऱ्यातील दोन्ही राजे नगर पालिकेच्या विकासावरून एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. येत्या 30 मार्च रोजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस असून विविध कार्यक्रमांचा आयोजन सातारा शहरात केले जात आहे. विलासपूर येथे रात्री झालेल्या महिलांच्या कार्यक्रमात आमदार शिवेंदद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उदयनराजे हे विकास कामांवर जे बोलत आहेत याबाबत त्यांनी एक डायलॉग बोलून दाखवला आहे. दिखावे पे मत जाओ अपनी अक्कल लगाओ, असा सातारा शहरातील नागरिकांना उदयनराजे करत असलेल्या कामाबाबत बोलून दाखवलं आहे… कोणतही काम राज्य सरकारने केलं की ते काम आम्ही केलं, असं उदयनराजे सांगत आहे आणि जे काम होत नाही याचा खापर इतरांवर फोडलं जात असल्याचा आरोप यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

Published on: Mar 27, 2023 04:00 PM