Akola | अकोल्यात राष्ट्रवादी,भाजपचे आमदार एका मंचावर

Akola | अकोल्यात राष्ट्रवादी,भाजपचे आमदार एका मंचावर

| Updated on: Aug 28, 2022 | 7:35 PM

मूर्तिजापूर भाजप आमदार हरीष पिंपळे,आणि अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाखळे असे हे दोन आमदार सोबत दिसून आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार एकाच मंचावर एकत्र दिसले; आता चर्चेला उधान आले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार भैय्यासाहेब तिडके यांच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त जयंत पाटील हे मूर्तिजापूरमध्ये आले होते. यावेळी जयंत पाटील यांच्या सोबत भाजपच्या दोन आमदारांनी घेतला भोजनाचा आस्वाद घेतला. राष्ट्रवादीचे नेते आणि भाजप आमदार एकत्र दिसल्याने चर्चेला उधान त्यांच्यात अनेक गोष्टी रंगल्या आहेत. अमृत महोत्सवाची सांगताही भाजपच्या आमदाराने राष्ट्रगीत म्हणून केली, नंतर जेवणाचा आस्वाद घेतांनाही भाजप आमदार अन राष्ट्रवादी नेते सोबत होते. मूर्तिजापूर भाजप आमदार हरीष पिंपळे,आणि अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाखळे असे हे दोन आमदार सोबत दिसून आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.