राज्यसभेत Sanjay Raut यांनी कायद्याच्या गैरव्यवहाराचा मुद्दा मांडला

| Updated on: Apr 06, 2022 | 8:47 PM

केंद्र सरकारकडून कायद्याचा दुरुपयोग सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. मात्र, सभापतींनी संजय राऊत यांना बोलण्यापासून रोखलं. संजय राऊत यांचं बोलणंही रेकॉर्डवर येणार नसल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं.

नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) नेते, मंत्री, आमदार, खासदारांवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावरही ईडीने कारवाई केलीय. त्या पाठोपाठ मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्तीही जप्त करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. खुद्द संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. महत्वाची बाब म्हणजे बुधवारी संजय राऊत यांनी राज्यसभेतही आक्रमक पवित्रा धारण केला. केंद्र सरकारकडून कायद्याचा दुरुपयोग सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. मात्र, सभापतींनी संजय राऊत यांना बोलण्यापासून रोखलं. संजय राऊत यांचं बोलणंही रेकॉर्डवर येणार नसल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं.