Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मावळात पुष्पा गँगचा धुमाकूळ, टोळक्यानं वडेश्वर गावात चंदनाचं झाड कापून पळवलं

मावळात पुष्पा गँगचा धुमाकूळ, टोळक्यानं वडेश्वर गावात चंदनाचं झाड कापून पळवलं

| Updated on: Apr 05, 2022 | 11:57 AM

पु्ण्यात (Pune) चंदन झाडांची तस्करी (Smuggling of sandalwood trees) वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण मागच्या दोन दिवसापुर्वी पुण्यातील एका नदीत चंदनाचे ओंडके लपवले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी (Pune Police) तिथून सगळे ओंडके ताब्यात घेतले. आता आंदर मावळातील वडेश्वर गावात दहा ते बारा चंदन चोरांच्या टोळक्याने मध्यरात्री चंदनाचे झाड कापून नेले आहे.

पु्ण्यात (Pune) चंदन झाडांची तस्करी (Smuggling of sandalwood trees) वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण मागच्या दोन दिवसापुर्वी पुण्यातील एका नदीत चंदनाचे ओंडके लपवले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी (Pune Police) तिथून सगळे ओंडके ताब्यात घेतले. आता आंदर मावळातील वडेश्वर गावात दहा ते बारा चंदन चोरांच्या टोळक्याने मध्यरात्री चंदनाचे झाड कापून नेले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यांनी शेतकऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. शेतकऱ्याला त्याच्या घरात डांबून ठेवले. चंदन चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. झालेल्या प्रकारामुळे पोलिसांनी दुर्गम भागात गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. वडगाव पोलिस चंदन चोरांचा शोध घेत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण

आंदर मावळातील वडेश्वर गावात चंदनाची अनेक झाडे आहेत. महेश शिंगारे यांच्या अंगणात चंदनाचं एक जुन झाडं आहे. मध्यरात्रीच्या वेळेस काही चंदन तस्करी करणारे वडेश्वर गावात आले. त्यावेळी त्यांनी महेश शिंगारे यांच्या अंगणात असलेलं झाडं तोडायला सुरूवात केली. परंतु आवाज येत असल्याने महेश शिंगारे झोपेतून जागे झाले. चोरट्यांना विरोध केला असता. चोरट्यांनी महेश शिंगारे यांना मारहाण केली आणि घरात डांबून ठेवलं. हातातली शस्त्र दाखवून लोकांना भीती दाखवली. तसेच परिसरातल्या लोकांच्या घरावरती देखील दगडफेक केली. याबाबत महेश शिंगारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या टोळीचा मोरक्या कोण आहे. टोळीत लोक किती आहेत याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.