Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णद्वार! 3 दिवसात बसवले जाणार ‘इतके’ सोन्याचे दरवाजे
रामलल्लांच्या मंदिराचे भव्य बांधकाम तुम्ही पाहिले असेलच पण आता चक्क राम मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णद्वार बसवण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा हा पहिला सोन्याचा दरवाजा बसवण्यात आला आहे. इतकंच नाहीतर त्याचबरोबर येत्या तीन दिवसांत आणखी 13 सोन्याचे दरवाजे या भव्य मंदिरात बसवले जाणार आहेत
अयोध्या, १० जानेवारी २०२४ : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने अयोध्येत राममय वातावरण निर्माण झालं आहे. तर रामलल्लांच्या मंदिराचे भव्य बांधकाम तुम्ही पाहिले असेलच पण आता चक्क राम मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णद्वार बसवण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा हा पहिला सोन्याचा दरवाजा बसवण्यात आला आहे. इतकंच नाहीतर त्याचबरोबर येत्या तीन दिवसांत आणखी 13 सोन्याचे दरवाजे या भव्य मंदिरात बसवले जाणार आहेत. राम मंदिराला बसवण्यात येणाऱ्या या दरवाज्यांना सोन्याचा लेप लावण्यात आला आहे. नुकतंच रामलल्लाच्या गर्भगृहाचं सुवर्ण द्वार बसवण्यात आलं आहे आणि या बसवलेल्या सोन्याच्या दरवाज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गर्भगृहाच्या मुख्य दरवाजांचे पूजन पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंच्या दरवाजांचे काम अद्याप सुरू आहे. या सुवर्णद्वारावर हत्ती, कमळाची फुलं, नक्षीदार कोरीव डिझाईन या सुवर्णद्वारावरची भव्यता आणि देखणेपणा आणखी खुलवते.