गोपीचंद पडळकर यांच्यावर कुणी फेकली चप्पल? या घटनेचा ठिकठिकाणी निषेध, उद्या इंदापूर बंद
सकल ओबीसी समाजाकडून इंदापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकावणाऱ्याला अटक करा अशी मागणी इंदापूरकर आणि धनगर समाजाकडून करण्यात येत आहे
मुंबई, १० डिसेंबर, २०२३ : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चप्पल फेकून मारल्याच्या निषेधार्थ उद्या इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सकल ओबीसी समाजाकडून इंदापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकावणाऱ्याला अटक करा अशी मागणी इंदापूरकर आणि धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. तर याच निषेधार्थ अहमदनगरला श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गाव उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आलं आहे. 9 हजार लोकवस्ती असलेल्या गावात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय. काल शनिवारी इंदापूर येथे ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर एका उपोषण स्थळाला भेट द्यायला जाताना त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. याच पार्श्वभूमीवर हंगेवाडी गावात बंद पाळून निषेध नोंदविण्यात आलाय.
Published on: Dec 10, 2023 05:55 PM
Latest Videos