Beating The Retreat | अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट, पाहा भारतीय जवानांचं शौर्य

| Updated on: Aug 15, 2023 | 8:41 PM

Independence Day 2023 | बीटिंग द रिट्रीट हा सोहळा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भारतीयांनी उपस्थिती लावली होती. या दरम्यान भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

वाघा बॉर्डर | देशभरात आज मोठ्या उत्साहात 76 ना स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाचा एक वेगळाच उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळतो. अनेक जण अट्टारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी आवर्जून जातात. यंदाही मोठ्या प्रमाणात देशातील नागरिकांनी विविध राज्यांमधील नागरिकांनी बीटिंग द रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. बीटिंग द रिट्रीट सोहळ्यात भारतीय सैनिकांनी आपलं शौर्य दाखवलं. तसेच उपस्थितांनी देशभक्तीपर गाण्यांवर ठेका धरला. तसेच उपस्थितांनी ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा ही दिल्या.

महिला जवानांचाही सहभाग

बीटिंग रिट्रीट सोहळ्यात भारताकडून बीएसफचे जवान आणि पाकिस्तानकडून पाक रेंजर्स सहभागी होतात. बीटिंग द रिट्रीटमध्ये नेहमी पुरुषांचाच दबदबा पाहायला मिळालाय. मात्र या वेळेस बीटिंग द रिट्रीटमध्ये बीएसएफ अर्थात बॉर्डर सेक्युरिटी फोर्सच्या महिला जवानही सहभागी झाल्या होत्या. बीटिंग रिट्रीट या सोहळ्याला 1959 पासून सुरुवात झालली. समारोहादरम्यान राष्ट्रगीत वाजवलं जातं. तसेच नागरिकांकडून देशभक्तीपर घोषणा देण्यात येतात.

Published on: Aug 15, 2023 08:41 PM