Pahalgam Terrorist Attack Updates : पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
सरकारच्या पातळीवर हालचाली वाढल्या असून 26 पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो.
26 पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो. सरकारच्या पातळीवर हालचाली वाढल्या असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. त्यानंतर कोणत्याही अॅक्शनसाठी तिन्ही दलांचं सैन्य तयार असल्याचं मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हंटलं.
पहलगाम अतिरेकी हल्ल्यात जीव गमावलेल्या 26 पर्यटकांच्या हत्येचा बदल घेणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी आर्मी प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची भेट घेतली. त्यानंतर राजनाथसिंगमोदींच्या भेटीला आले. ही भेट जवळपास पाऊण तास चालली. यात पहलगाममध्ये सुरू असलेलं सर्च ऑपरेशन आणि सध्याच्या स्थितीची माहिती त्यांनी पंतप्रधान मोदींना दिली. तर दुसरीकडे संरक्षण विषयक संसदीय समितीची बैठक झाली. यात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी हजर होते. देशात हालचालींना वेग आलेला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पहलगाम हल्ल्याचा बदला भारत घेईल अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

