IND vs AUS Final : १०० टक्के इंडियाच जिंकणार, भारतीयांमध्ये एकच उत्साह अन् धडधड; मोदी स्टेडिअम बाहेर क्रिकेटप्रेमींचं वादळ
प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची धडधड वाढत चालली आहे. हा सामनासुरू होण्यापूर्वी भारतीयांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळत आहे. तर मोदी इंडियम बाहेर क्रिकेटप्रेमींचं वादळच जणू आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय संघाला चेअरअप करण्यासाठी प्रत्येक भारतीय सज्ज
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३ : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. तर आज होणाऱ्या सामन्यातील दिमाखदार आणि शानदार लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या अंतिम सामन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटकरून टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची धडधड वाढत चालली आहे. हा सामनासुरू होण्यापूर्वी भारतीयांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळत आहे. तर मोदी इंडियम बाहेर क्रिकेटप्रेमींचं वादळच जणू आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय संघाला चेअरअप करण्यासाठी प्रत्येक भारतीय हा सज्ज आहे. तर सामन्याच्या अखेरीस विश्वचषक आपलाच असेल असा आत्मविश्वासही प्रत्येक भारतीयाला आहे. तर १०० टक्के इंडियाच जिंकणार…असा विश्वासही स्टेडिअम बाहेर गर्दी केलेल्या क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.