World Cup 2023 : सोन्या-चांदीनं मढवलेल्या World Cup Trophy ची किंमत ऐकून तुम्ही व्हाल गार, बघा किती आहे किंमत?
1975 साली वर्ल्डकपची सुरुवात झाली त्यावेळी 1996 पर्यंत विजेत्या संघाला वेगवेगळ्या ट्रॉफी दिल्या जायच्या. 1999 नंतर एकच ट्रॉफी देण्याचा निर्णय झाला जो आजतागायत कायम आहे. सध्याची चमचमाती ट्रॉफी लंडनच्या 300 वर्ष जुन्या कंपनीने बनवलीये. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास 2 महिने ही ट्रॉफी डिझाईन करण्यासाठी मेहनत घेतली.
मुंबई, १९ नोव्हेंबर २०२३ : गेल्या ४५ दिवसांपासून क्रिकेटचा रणसंग्राम सुरू होता. अशातच चमकदार कामगिरी करत भारतीय संघाने विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात धडक दिली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्याचा थरार रंगताना दिसतोय. अशातच जेते पदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेण्यासाठी टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू जीवाचं रान करताना दिसतोय. आपलं नाव त्या विश्वचषकाच्या ट्रॉफीवर कोरलं जावं यासाठी प्रत्येक भारतीयांच्या देवाकडेच धावा सुरू आहे. पण हा क्रिकेट वर्ल्डकपचा सामाना कोण जिंकतं आणि आकर्षक ट्रॉफीवर कोण नाव कोरतं याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. ती ट्रॉफी जिंकण्यासाठी सगळ्या टीम अफाट मेहनत घेतात. क्रिकेट वर्ल्डच्या चमकदार ट्रॉफीची किमंत तुम्हाला माहिती आहे? त्याच ट्रॉफीची वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या.