IND vs AUS Final : पुण्यातील कसबा पेठेत World Cup 2023 अंतिम सामन्याचा फीव्हर

IND vs AUS Final : पुण्यातील कसबा पेठेत World Cup 2023 अंतिम सामन्याचा फीव्हर

| Updated on: Nov 19, 2023 | 2:27 PM

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना सुरू. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी मुकाबला करण्यास सज्ज. भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पुण्यातील गुडलक चौकात भव्य रांगोळी तर कसबा पेठेत बघा कशा दिल्या पुणेकरांनी शुभेच्छा...

पुणे, १९ नोव्हेंबर २०२३ : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना सुरू झाला आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडतोय. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी मुकाबला करण्यास सज्ज झाला आहे. भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पुण्यातील गुडलक चौकात भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. तर पुण्यातील गुडलक चौकासह कसबा चौकात दैखील क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्याचा फीव्हर पाहायला मिळत आहे. पुण्यातील कसबा पेठेमध्ये या अंतिम सामन्याची उत्सुकता पुणेकरांमध्ये पाहायला मिळत आहे. कसबा पेठेत भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे कटआऊट्स लावल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात या अंतिम सामन्याची उत्सुकता असून देशभरात भारतीय संघाला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Nov 19, 2023 02:27 PM