India-Pakistan Tension : आदेश आला तर 2 मिनिटांत… भारतीय सैन्य दलातील विमानांना मोठा निर्देश, ‘पहलगाम’नंतर LOC वर हालचाली वाढल्या?
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या प्रत्येक हालचालीकडे पाकिस्तानचं नव्हे तर जगाचं लक्ष लागलं आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर एलओसीवर हालचाली वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय सैन्य दलातील विमानांना दोन मिनिटांत सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारताने एलओसीवरील गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी पाठवले आहेत. तर पाकिस्ताकडून नियंत्रण रेषेवर जवानांची ताकद वाढवण्यात आली असून मोठ्या संख्येने तोफा तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भारतीय कारवाईचा अंदाज घेऊन पाकिस्तानी सैन्याने आपले सैन्य सुरक्षित ठेवण्यासाठी Pok मधील पारंपारिक लॉन्च पॅड्समधून दहशतवाद्यांना हलवण्यास सुरुवात केली असून त्यांना बंकरमध्ये ठेवलं असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
Published on: Apr 29, 2025 02:45 PM
Latest Videos

देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...

भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...

चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...

युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
