Special Report | भारताची मिसाईल चुकून पाकिस्तानात कोसळली, पाक मीडियात गंभीर प्रतिक्रिया

| Updated on: Mar 14, 2022 | 10:11 PM

भारताचं एक मिसाईल चुकून पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. त्यावरुन पाकिस्तानी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. तर, भारतात सोशल मीडियात त्यावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहे.

भारताचं एक मिसाईल चुकून पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. त्यावरुन पाकिस्तानी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. तर, भारतात सोशल मीडियात त्यावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यात मिसाईल वॉर सुरु असताना भारताचं एक पाकिस्तानच्या हद्दीत तांत्रिक बिघाडामुळं पडलं. भारतानं यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. यावरुन पाकिस्तानी माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहेत. 9 मार्चला तांत्रिक बिघाडामुळं हे मिसाईल हरियाणातून सुटलं आणि ते पाकिस्तानात पडलं. पाकिस्ताननं या मिसाईलमुळं मोठी दुर्घटना झाली असती , असा दावा केला. तर, भारतात सोशल मीडियावर यावरुन गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Published on: Mar 14, 2022 10:10 PM
Special Report | काँग्रेसच्या धुसफुसीत देवेंद्र फडणवीस यांनी तेल ओतलं?
अर्थमंत्री कसा असावा? उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल