Balu Dhanorkar | ‘भारताची Ban China घोषणा ठरली पोकळ, चिनी वस्तूंवर बहिष्कार ठरला फुसका’
चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन म्हणजे पोकळ वल्गना असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेत चंद्रपूर(Chandrapur)चे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्र्यांनी चीनसोबत व्यापार वाढल्याची आकडेवारी दिली.
स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा अशा घोषणा सण-उत्सव आल्यावर उच्चरवाने केला जातो. मात्र प्रत्यक्षात चीन(China)सोबत आयात-निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन म्हणजे पोकळ वल्गना असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेत चंद्रपूर(Chandrapur)चे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्र्यांनी चीनसोबत व्यापार वाढल्याची आकडेवारी दिली. गेल्या सात वर्षात भारत-चीन सोबत आयात व निर्यात संबंधी वाढ झाली काय? किंवा घट झाली काय ? या संबंधी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता. केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी चीनकडून भारतात आयात करण्यात 2014-15 ते 2020-21पर्यंत वाढ झाल्याचे सांगितले.
Latest Videos