अदानी प्रकरणी शरद पवार यांच्या भूमिकेवर अजित पवार यांचे स्पष्टीकर; म्हणाले...

अदानी प्रकरणी शरद पवार यांच्या भूमिकेवर अजित पवार यांचे स्पष्टीकर; म्हणाले…

| Updated on: Apr 08, 2023 | 12:51 PM

शरद पवार यांनी या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशीची मागणी निरर्थक असल्याचे म्हटले. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे

पुणे : उद्योगपती गौतम अदानी प्रकरणी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका काल स्पष्ट केली. त्याचबरोबर त्यांनी, या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशीची मागणी निरर्थक असल्याचे म्हटले. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. याचदरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी, शरद पवार यांची मुलाखत एका वृत्तवाहिणीवर आपण पाहिली. शेवटी ते आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखादी भूमिका मांडली तर ती आमच्या पक्षाची असते. पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. जी त्यांची भूमिका तीच आमची पक्षाची भूमिका असते. आमची सर्वांची भूमिका आहे, असे अजित पवार म्हणाले.

 

Published on: Apr 08, 2023 11:35 AM