Rakesh Tikait Ink Attack | भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक!
ही शाई स्थानिक शेतकरी नेते के चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी फेकल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार परिषदेदरम्यान टिकैत यांना पत्रकारांनी शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता उपस्थित लोकांनी सांगितले.
नवी दिल्ली – कर्नाटकची (Karnataka) राजधानी बेंगळुरूमध्ये (Bengaluru) शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान हाणामारी होऊन हा प्रकार घडला. यानंतर राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. त्याचवेळी या घटनेनंतर कार्यक्रमात एकमेकांवर जोरदार खुर्च्या फेकण्यात आल्या. ही शाई स्थानिक शेतकरी नेते के चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी फेकल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार परिषदेदरम्यान टिकैत यांना पत्रकारांनी शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता उपस्थित लोकांनी सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना टिकैत म्हणाले की, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे ऐकताच चंद्रशेखर यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी टिकैत यांच्यावर शाई फेकली.
Latest Videos