गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण…. व्हिडिओ व्हायरल
रेल्वेने प्रवास करताना बऱ्याचदा IRCTC कर्मचारी जास्त पैसे घेत असल्याचा प्रकार पाहायला मिळालाय, अशातच आता IRCTC कर्मचाऱ्यांकडून गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवाशावर दादागिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
छापलेल्या किमती (MRP) पेक्षा जास्त दराने खाद्यपदार्थ विक्रीवरून प्रवाशांवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार धावत्या एक्स्प्रेसमध्ये पाहायला मिळाला. गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून प्रवाशावर दादागिरी करण्यात आल्याचा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. IRCTC कर्मचाऱ्यांकडून गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवाशावर हात उचलण्यात आला इतकंच नाहीतर ददागिरी देखील कऱण्यात आल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ MRP पेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करत त्याचा मोबाईल देखील हिसकवण्यात आला आणि या व्यक्तीचा फोन स्टोअररूममध्ये ठेवला. दरम्यान, कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेस गाडीमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकारासंदर्भात कल्याण जीआरपीने सात आरोपींविरोधात BNS कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तर पुढे हे प्रकरण बडनेरा GRP कडे सुपूर्द केले असल्याची माहिती मिळतेय.

नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक

दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी

मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला

शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
