इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांवर शासनाची फुंकर; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा, 7 एकराची जागा ही मिळाली

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांवर शासनाची फुंकर; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा, 7 एकराची जागा ही मिळाली

| Updated on: Jul 26, 2023 | 12:13 PM

येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर 55 हून अधिक लोकांना बेपत्ता घोषित करताना त्यानांही मृत घोषित करून करण्यात आले होते. तर घटनेच्या चौथ्या दिवशी एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले.

रायगड, 26 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर 55 हून अधिक लोकांना बेपत्ता घोषित करताना त्यानांही मृत घोषित करून करण्यात आले होते. तर घटनेच्या चौथ्या दिवशी एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले. तर जे वाचले त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी आधीच घोषित केलं होतं. त्यानंतर आता इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी महत्वाची बातमी हाती आली असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाठी ७ एकर जागा मिळाल्याचे कळत आहे. तर या ७ एकर जागेत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या दुर्घटनेत वाचलेल्यांचे त्यांच्या आदिवासी वाड्याकडे जाणाऱ्या ट्रेक मार्गाच्या पायथ्याशी असलेल्या नानिवली गावातच सात एकर जागेवर पुनर्वसन होणार आहे. यासाठी इर्शालवाडी रहिवाशी आणि अधिकार्‍यांनी जागेला भेट दिली. त्यानंतर या सात एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इर्शालवाडी रहिवाशी सहमती दर्शवल्याचे कळत आहे. तर नानिवली गावात सुमारे 50 घरे बांधली जाणार आहेत.

Published on: Jul 26, 2023 12:13 PM