IPL 2022 Auction | IPL लिलावात Ishan Kishanला सर्वाधिक बोली
पंजाब, SRH आणि गुजरातशी झाली टक्कर लगेच इशानचा भाव सहा कोटीपर्यंत गेला. त्यानंतर गुजरात टायटन्सने बोली लावली व इशानची किंमत थेट 10 कोटीच्या घरात गेली. त्यानंतर हैदराबादचा संघ बोलीमध्ये उतरला. मुंबई आणि हैदराबादमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली. अखरे मुंबईनेच बाजी मारली.
मुंबई: इशान किशन (Ishan kishan) आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावून इशान किशनला विकत घेतलं. याआधी मुंबईचाच श्रेयस अय्यर (Shreyas iyer) सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. इशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबईने आपली पूर्ण आर्थिक ताकत पणाला लावली. याआधी मुंबईने कुठल्याही खेळाडूसाठी 10 कोटी पर्यंत रक्कम खर्च केली नव्हती. रोहित शर्मासाठी मुंबईने याआधी सर्वाधिक रक्कम खर्च केली होती. पंजाब, SRH आणि गुजरातशी झाली टक्कर लगेच इशानचा भाव सहा कोटीपर्यंत गेला. त्यानंतर गुजरात टायटन्सने बोली लावली व इशानची किंमत थेट 10 कोटीच्या घरात गेली. त्यानंतर हैदराबादचा संघ बोलीमध्ये उतरला. मुंबई आणि हैदराबादमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली. अखरे मुंबईनेच बाजी मारली. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.