“ते वक्तव्य मीच केलं होतं”,अर्जुन खोतकरांची कबुली
नवी दिल्लीत खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वैर संपवण्याचे प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून होत आहेत. पण हेच अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंबद्दल काय बोलले होते, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्तव्य केलं होतं.
नवी दिल्लीः दोन दिवसांपूर्वी अर्जुन खोतकरांशी झालेल्या संवादात खोतकरांनी दानवेंवर किती जहाल टीका केली होती, याबदद्ल राऊत बोलले होते. आज नवी दिल्लीत पत्रकारांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यातील दावे खरे आहेत का, असे विचारले असता खोतकरांनी त्याला दुजोरा दिला. तसेन दानवे आणि माझ्यातील वैर अद्याप संपले नसून त्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याचेही खोतकरांनी सांगितले. रावसाहेब दानवेंचं (Raosaheb Danve) राजकारण संपल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे वक्तव्य मीच केलं होतं, अशी कबूली जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिलील आहे. नवी दिल्लीत खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वैर संपवण्याचे प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून होत आहेत. पण हेच अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंबद्दल काय बोलले होते, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्तव्य केलं होतं.