Pahalgam Attack : दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू… भारताच्या आर्मीनं थेट यादीच केली जाहीर, आता पुढे काय?
जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत ७ दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. त्राल, अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये शोध मोहिमेदरम्यान लष्कराने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर दहशतवाद्यांना चांगलाच घाम फुटला आहे. आता पुढे आपली पाळी येईल, अशी भीती सर्वांनाच आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पाऊलं उचलली जात आहे. आता पहलगाममघील हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधू काढण्यासाठी यंत्रणा अॅक्शनमोडवर आली आहे. अशातच भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमधील सक्रीय दहशतवाद्यांची एकच यादीच जाहीर कऱण्यात आली आहे. त्यामुळे आता दहशतवाद्यांचं काउंटडाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय.
भारतीय सैन्याकडून जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. सध्या काश्मीरमध्ये एकूण 14 स्थानिक दहशतवादी सक्रिय असून त्यांची संपूर्ण माहिती भारतीय सैन्याने मिळवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोपोरमध्ये लष्कर ए तोयबाचा एक स्थानिक दहशतवादीही सक्रिय आहे. तर अवंतीपुरा या भागात जैस ए मोहोम्मद या दहशतवादी संघटनेचा एक आंतकवादी सक्रीय असून पुलवामामध्ये जैश ए मुहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही दहशतवादी संघटनांचे प्रत्येकी दोन दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती मिळतेय. बघा समोर आलेली यादी… यामध्ये कोणा-कोणाचा आहे समावेश?

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
