Pahalgam Terror Attack : ‘…पण तोपर्यंत उशीर झाला होता, आम्ही कपाळाच्या टिकल्या काढून फेकल्या अन्…’, कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला अंगावर आणणारा अनुभव
'एका स्थानिक मुस्लिमानं अतिरेक्यांना अडवलं, पण अतिरेक्यांनी त्यालाही गोळ्या घातल्या. तुम्ही निरपराध लोकांना का मारता असं तो स्थानिक मुस्लीम अतिरेक्यांना म्हणत होता. आम्ही पळत सुटलो. आमचे पाय गुडघ्यापर्यंत रुतत होते.'
जम्मू काश्मीर येथील श्रीनगरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी जीव गेला. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश असून संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे अशी त्यांची नावं आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे पुण्यातील कर्वेनगर येथे जगदाळे कुटुंबासह जगदाळे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेत. यावेळी कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. ‘माझ्या समोर पतीला गोळ्या घातल्या. मदत उशिरा मिळाली, तोपर्यंत कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला होता. आम्हाला अजाण म्हणा असं सांगत होते. एका मुस्लिमाने अतिरेक्यांना अडवलं तर त्यालाही गोळ्या घातल्या’, असं गनबोटे यांच्या पत्नीने सांगितलं. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाह हू अकबर असं म्हणायला लागलो. आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्याचीही मदत मिळाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री

नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक

दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी
