आई-वडिलांना शिव्या द्या..पण मोदी-शहांना सहन होणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटील सडेतोड!
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या वक्तव्यावर सणकून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
मुंबईः आई वडिलांना शिव्या द्या, ते चालेल… पण मोदी आणि अमित शहांना (PM Narendra Modi) शिव्या दिलेलं सहन होणार नाही, असं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या वक्तव्यावर सणकून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
आधी पाहा चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
मराठी माणसं आई-वडिलांना शिव्या कधीही देत नाही. चंद्रकांतदादांचं हे वक्तव्य चुकीचं आहे. त्यातही मोदी-शहांची तुलना आई-वडिलांशी करणं हे अत्यंत चुकीचं आहे.
मोदी आणि शहा हे राजकारणी आहेत. त्यांना शिव्या देणं वेगळा आशय आणि आई-वडिलांकडे केलेला हट्ट वेगळा विषय असतो, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.
पुण्यात शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांचा सत्काराचा कार्यक्रम होता. पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळच्या भाषणात बोलता बोलता हे वक्तव्य केलं.
विषय होता भाजपने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात विरोधकांचा कसा पराभव केला असा… चंद्रकांत पाटील यांनी यावेळी हातकणंगले मतदार संघातील निवडणुकीचा किस्सा सांगितला. राजू शेट्टी तेव्हा अनेकदा मोदींना शिविगाळ करत होते.. पण आपण शेट्टींना सव्वा लाख मतांनी हरवल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, परवा एका केंद्रीय नेत्याची भेट झाली. ते म्हणाले दादांनी मला संपवली. केंद्रीय नेते 40 वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले, दादा कुणाला संपवत नाहीत. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ देत. आईवरून शिव्या देणं आमची कोल्हापुरची पद्धत आहे. पण दादा हे मोदी आणि शहांना शिव्या देणं सहन करू शकत नाहीत… असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय.