गल्लीबोळात फिरून विचारतात पुढचा पंतप्रधान कोण पाहिजे? चंद्रशेखर बावनकुळे यांना कुणाचा टोला?
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तुफान येणार आहे. नरेंद्र मोदी महाविकास आघाडीला साफ करणार, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी दिलं खोचक प्रत्युत्तर
मुंबई, ३ जानेवारी २०२४ : महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तुफान येणार आहे. नरेंद्र मोदी महाविकास आघाडीला साफ करणार, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे गल्लीबोळात फिरून पुढचा पंतप्रधान कोण होणार? हे कशाला विचारतात. जर सगळीकडे पालापाचोळ्याने विरोधक उडून जाणार आहेत असतील तर गल्लीबोळात फिरुन पुढचा पंतप्रधान कोण हे का विचारतात? असा टोलाही जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. महायुतीने आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ही संयुक्त पत्रकार परिषद होती. भाजचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे हे यावेळी उपस्थित होते.