अमित शाहांसोबत गुप्त भेट अन् लवकरच भाजपमध्ये जाणार?, सुरू असलेल्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच म्हणाले...

अमित शाहांसोबत गुप्त भेट अन् लवकरच भाजपमध्ये जाणार?, सुरू असलेल्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Aug 06, 2023 | 4:06 PM

VIDEO | अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात तासभर खलबतं, लवकरच भाजपमध्ये जाणार? सुरु असलेल्या चर्चांवर जयंत पाटील यांचं मोठं विधान, नेमकं काय केलं विधान?

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा आहे. इतकेच नाहीतर तर या दोघांमध्ये तासभर खलबतं झाली असून जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचेही सांगितलं जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या या चर्चांवर जयंत पाटील यांनी मोठं विधान करून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘माझी कुणाशीही भेट झाली नाही. भेट झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असा सवाल करतानाच मी काल, आज आणि उद्या शरद पवार यांच्यासोबतच आहे.’ तर माझ्याबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. कुणाशाही माझा संपर्क झालेला नाही. अशा बातम्या पेरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका घेत जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Aug 06, 2023 04:06 PM