झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ED कडून अटक?, काय आहे प्रकरण?
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या सात तासांपासून हेमंत सोरेन यांची कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु होती. याचौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
रांची, ३१ जानेवारी २०२४ : ईडीने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या सात तासांपासून हेमंत सोरेन यांची कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु होती. याचौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. तर हेमंत सोरेन हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवन येथे दाखल झाले आहेत. सोरेन सरकारमधील परिवहन मंत्री चंपई सोरेन यांच्याकडे आता सत्ता सोपवली जाणार असल्याचेही माहिती समोर येत आहे. दरम्यान, देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. अशातच ही घटना राजकीय भूकंप असल्याचे म्हटले जात आहे. हेमंत सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.