अन् जितेंद्र आव्हाड झाले भावूक, अजित पवार गटाला आव्हाडांनी थेट विचारले ‘हे’ 3 सवाल
tv9 Special Report |केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. कालच्या सुनावणीवर बोलताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक अन् अजित पवार गटाला आव्हाडांनी थेट विचारले हे 3 सवाल
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन सुनावणी झाली. मात्र अजित दादांच्या गटाचा युक्तिवाद ऐकून आव्हाडांना अश्रू तरळले. शरद पवार, लोकशाही मानणारे नाहीत असं सांगत अजित दादांच्या गटानं हुकूमशाह म्हटल्याचं आव्हाड म्हणालेत. त्यानंतर अजित पवार गटाला आव्हाडांनी 3 सवाल केलेत. इतकेच नाही तर शरद पवारांवर अजित पवार गटानं आक्षेप घेतल्यानंतर नेहमी आक्रमकतेनं बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार मर्जीप्रमाणं पक्ष चालवतात, असा युक्तिवाद निवडणूक आयोगात अजित दादांच्या गटाच्या वकिलांनी केला. त्यामुळं अजित पवार गटानं शरद पवारांना हुकुमशाह ठरवल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे. दरम्यान, निवडणुकीत आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवेळी शरद पवार स्वत: हजर होते. शरद पवारांच्या समोरच, अजित दादांच्या गटाच्या वकिलांनी शाब्दिक हल्ले केले. त्यामुळं आव्हाडांनी दादांच्या गटाला 3 सवाल केलेत. कोणते ते सवाल बघा स्पेशल रिपोर्ट