श्रेयवादाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हांडाची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
ठाण्यातील एका कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण मी कधी केले नाही, श्रेय कुणालाही घेऊ द्या, राजकारण कोण करतं हे लोकांना माहित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील एका कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण मी कधी केले नाही, श्रेय कुणालाही घेऊ द्या, राजकारण कोण करतं हे लोकांना माहित असतं, नुसते बॅनर झेंडे लावून काही होत नसल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी देखील ठाण्यात श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती. या कार्यक्रमाला शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही उपस्थित होते. आज पुन्हा एकदा श्रेयवादावरून जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Latest Videos