पावसामुळे ‘हा’ राज्य महामार्ग खचला; खचलेल्या रस्त्याला नदी कधीही करू शकते गिळंकृत
मात्र काही जिल्ह्यांत अजूनही पावसाने दडी मारली आहे. तर आता काही जिल्ह्यात पाऊस होत आहे. मात्र मागिल पंधरा दिवसापासून कोकणात जोरदार पाऊस पडत असल्याने येथे अनेक नद्यांना पूर आला आहे. ज्यामुळे रस्ते बंद होत आहेत.
रत्नागिरी, 31 जुलै 2023 | राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. मात्र काही जिल्ह्यांत अजूनही पावसाने दडी मारली आहे. तर आता काही जिल्ह्यात पाऊस होत आहे. मात्र मागिल पंधरा दिवसापासून कोकणात जोरदार पाऊस पडत असल्याने येथे अनेक नद्यांना पूर आला आहे. ज्यामुळे रस्ते बंद होत आहेत. त्यातच आता रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी लांजा हा राज्य महामार्ग देखील खचलाय. खचलेल्या या महामार्गावरून सध्या धोकादायक वाहतुक सुरु आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्ता खचण्याच्या प्रमाण वाढले आहे. खचलेल्या रस्त्याला लागून काजळी नदीचे पात्र असून नदी सध्या जोरदार वाहत आहे. त्यामुळे हा रस्ता गिळंकृत होण्याची शक्यता असून सोमेश्वर, चांदेराई, चिंद्रवली, ओशी हरचेरी अशी प्रमुख गावांच्या वाहतुकीचा प्रश्न उद्भवू शकतो. तर हा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाला आणि रत्नागिरीतून लांज्याला जाण्यासाठी पर्यायी आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जातेय.