सत्तेसाठी इटालियन बारबालाच्या पायाशी लोळण; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
Kalicharan Maharaj On Uddhav Thackeray : काही दिवसांआधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. कालिचरण महाराज यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : काही दिवसांआधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. कालिचरण महाराज यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुंचा विश्वासघात केला. त्याचमुळे त्यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याचं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. सत्तेसाठी इटालियन बारबालाच्या पायाशी लोळण घेतलं. हिंदू विरोधी विचारांच्या लोकांशी हात मिळवणी केली. स्वत: च्या तत्वांना पायाखाली चिरडलं. सत्यानाश करून घेतला. आता निवडणुकीत त्यांनी काही करून दाखवावं. सगळे हिंदू आपल्या विश्वास घाताचा बदला घेतील, असं कालिचरण महाराजांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 12, 2023 08:03 AM
Latest Videos