Kalyan : जे पुण्यातील ‘दीनानाथ’मध्ये घडलं तेच कल्याणमध्ये? KDMC रूग्णालयात गर्भवतीचा गेला जीव अन्…
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारी शांती देवी अखिलेश मौर्य ही महिला दोन महिन्याची गर्भवती होती. तिला या आधी तीन मुले आहेत. तिच्या पतीने तिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या शक्तीधाम प्रसूतीगृहात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुण्यातील दिनानथ मंगेशकर रूग्णालय चांगलंच चर्चेत आहे. पुण्यातील रूग्णालयाच्या मुजोरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात असताना कल्याणमधून तसाच काहीसा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रूग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शक्तीधाम रूग्णालयात ही घटना घडली. गर्भपात आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झालाय. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे. कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात भूल देण्याच्या इंजेक्शननंतर महिलेला त्रास जाणवू लागला. यानंतर तिला प्रसूतीगृहातून खासगी रूग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. शांतीदेवी अखिलेश मौर्य असे मृत महिलेचे नाव आहे. बघा नेमकं काय घडलं?