Kanjurmarg Metro Car Shed : मोठी बातमी! कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर दावा सांगणारी याचिका मागे
कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवर दावा सांगणारी याचिका विकासकानं मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं सत्तेवर येताच मेट्रो-3 ची कारशेड आरेमध्ये बांधण्याच्या निर्णयाला पुन्हा हिरवा कंदील दिलाय.
मुंबई : एक मोठी बातमी हाती आली आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस राज्यात सत्ते आल्यापासून अनेक बदल पहायला मिळता आहे. यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कांजूरमार्ग कारशेडच्या (Kanjurmarg Metro Car Shed) जागेवर दावा सांगणारी याचिका विकासकानं मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारनं सत्तेवर येताच मेट्रो-3 ची कारशेड आरेमध्ये बांधण्याच्या निर्णयाला पुन्हा हिरवा कंदील दिलाय. महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) सरकारनं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारशेडच्या जागेचा निर्णय बदलला होता. मेट्रो-3 चं कारशेड कांजूरमधील जागी उभारण्यास मंजुरी दिली होती. विकासक गरोडिया यांनी मुंबई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मेट्रो कारशेड आरेतच बांधण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील मिळताच गरोडियांनी याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे शिंदे सरकार सत्ते आल्यापासून अनेक बदल पहायला मिळत आहे.