Karnataka Assembly Election Result : नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, यावेळी जवळपास…
बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 112 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे.
छ.संभाजीनगर : कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly Election Result) कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं (Congress) जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 112 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सध्या बॅलेटमध्ये सुशिक्षितांचं मतदान आहे. परिवर्तन सुरू होत आहे. यावेळी जवळपास 45 टक्के मतदान काँग्रेसला होणार आहे. काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. मागच्यावेळी काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि त्याचाच फायदा घेऊन मोदी सरकारने जनतेच्या कौलाविरोधात जाऊन सरकार स्थापन केलं. भाजप लोकशाही न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे.