धक्कादायक! परदेशी युट्युबरला मारहाण, एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका एका स्ट्रीट विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील चिकपेटे भागातील एका व्यस्त शॉपिंग लेनमध्ये डच पर्यटक तथा युट्युबर त्याच्या चॅनेलसाठी व्हिडिओ लॉग रेकॉर्ड करत होता.
बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका परदेशी युट्युबरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका एका स्ट्रीट विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील चिकपेटे भागातील एका व्यस्त शॉपिंग लेनमध्ये डच पर्यटक तथा युट्युबर त्याच्या चॅनेलसाठी व्हिडिओ लॉग रेकॉर्ड करत होता. तेव्हा तेथे त्याच्याशी एका स्ट्रीट विक्रेत्याने गैरवर्तन केले. तसेच त्याला मारहान केली. या डच युट्युबरचं नाव प्राडो मोटा आहे. तर ज्याने मारहान केली त्याच नाव नवाब हयात शरीफ असं आहे. तर महत्वाची बाब म्हणजे ही घटना दोन दिवसांपुर्वीची असून युट्युबरनं देश सोडल्यानंतर ती उघडकीस आली आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून परदेशी पर्यटकांसोबत असे कोणतेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही,” असे बंगळुरू पोलिसांनी म्हटलं आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

