Special Report | karnataka Assembly Elections : कर्नाटक निवडणूक भाजपची डोकेदुखीचं नेमकं कारण काय

Special Report | karnataka Assembly Elections : कर्नाटक निवडणूक भाजपची डोकेदुखीचं नेमकं कारण काय

| Updated on: Apr 16, 2023 | 8:39 AM

अँटीइन्कबन्सी, बंडखोरी आमदारांची नाराजी या तिहेरी संकटाला भाजपला तोंड द्यावं लागत आहे. बंडखोरीमुळे भाजपला येथे फटका बसण्याची शक्यता आहे

मुंबई : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि भाजप रिंगणात उतरे आहेत. 10 तारखेला मतदान आणि 13 तारखेला निकाल लागणार त्यामुळे विद्यमान आमदारांसह नवख्यांनी आपला नंबर लागावा म्हणून शड्डू ठोकला आहे. काँग्रेसला सध्या कर्नाटकात काही संकंट दिसत नाही. मात्र अँटीइन्कबन्सी, बंडखोरी आमदारांची नाराजी या तिहेरी संकटाला भाजपला तोंड द्यावं लागत आहे. बंडखोरीमुळे भाजपला येथे फटका बसण्याची शक्यता आहे. तिकीट कापलं गेल्याने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर नाराज आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदीही भाजपतून काँग्रेसमध्ये गेले आहेत. एम पी कुमारस्वामी जेडीएसमध्ये गेलेत. आमदार आर शंकरांनी, आमदार नेहरु ओलेकरांनी यांनी देखील राजीनामा दिला आहे. तर एस अंगारा यांनी नारपाजी व्यक्त करत निवृत्तीची घोषणा केली आहे. एकीकडे आमदारांचं आऊटगोईंग दुसरीकडे भाजपचे विरोधक वाढत आहेत. राष्ट्रवादीने देखील कर्नाटकात 40 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला ही निकडणूक साधीसोपी राहिलेली दिसत नाही. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 16, 2023 07:55 AM