Kolhapur Flood : कोल्हापुरकरांना धाकधुकीत दिलासा! राधानगरीचे चार दरवाजे उघडलेच, आता अलमट्टीतूनही विसर्ग वाढला

Kolhapur Flood : कोल्हापुरकरांना धाकधुकीत दिलासा! राधानगरीचे चार दरवाजे उघडलेच, आता अलमट्टीतूनही विसर्ग वाढला

| Updated on: Jul 27, 2023 | 11:03 AM

तर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठे धरण आता भरलेले आहेत. त्याचत राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सुदैवाने शहरात मात्र सध्या पावसाने उघडीप दिली आहे. शहर परिसरात पाऊस कमी होत असला तरिही घाटमाथ्यावर होणाऱ्या संततधारमुळे राधानगरी धरणाचे काल 5 दरवाजे उघडले होते.

रत्नागिरी, 27 जुलै 2023 | कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या पावसाचा जोर वाढलेलाच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. तर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठे धरण आता भरलेले आहेत. त्याचत राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सुदैवाने शहरात मात्र सध्या पावसाने उघडीप दिली आहे. शहर परिसरात पाऊस कमी होत असला तरिही घाटमाथ्यावर होणाऱ्या संततधारमुळे राधानगरी धरणाचे काल 5 दरवाजे उघडले होते. मात्र आज पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे 4 दरवाजे उघडलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे पंचगंगेची पाणीपातळी 40 फूटाच्या बाहेर गेली असून नदी धोका पातळीकेड जात आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका कायम आहे. याचदरम्यान कोल्हापुरकरांची चिंता वाढलीच असताना त्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातू विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कोल्हापुरसह सांगलीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. Kolhapur Flood

Published on: Jul 27, 2023 11:03 AM