Karuna Sharma : ‘त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात अडकवायचं आणि माझ्यासोबत…’, करूणा शर्मांचा खळबळजनक आरोप
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालेले नाही, असा दावा केला होता. यावर आज सुनावणी पार पडली.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्या याचिकेवर आज माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली. माझगाव कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर करुणा शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी करूणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला. दरम्यान, करूणा शर्मा यांनी याबाबतचे सर्व पुरावे कोर्टात सादर केले असल्याचे सांगितले आणि लवकरच यासंदर्भातील रेकॉर्डिंग लवकरच सादर करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
‘जर मी खोटी असती, माझ्याकडे पुरावे नसते, मी धनंजय मुंडे यांची बायको नसती तर मी पैसे घेऊन कधीच दुबईला पळून गेली असती. पण महाराष्ट्राच्या मंत्र्यानं २७ वर्षापासून सोबत राहणाऱ्या एका बाईला रस्त्यावर आणलं आहे. धनंजय मुंडेने दारू आणि मुली पुरवणाऱ्या दलाल लोकांना पाळलं आहे त्यामुळे आज ते घरी आहेत. ‘, असा गंभीर आरोप करूणा शर्मांनी केला. तर ११९६ साली मला हिरोईनची ऑफर आली होती. पण ते सगळं नाकारून मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकून माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते, असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहेत.