Karuna Sharma : ‘कराड एक मोहरा अन् मुंडेंचे सर्व काळे कारनामे…’, निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या ‘त्या’ ऑफरवरून करूणा शर्मांचा आरोप
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर बीडच्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला असल्याची मोठी माहिती समोर आली. यावर करूणा शर्मा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं'
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर बीडच्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. ‘वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काऊंटरसाठी 5 ते 10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते’, असे म्हणत खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्या दाव्यावर करुणा मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, असा घणाघात देखील करूणा शर्मा यांनी केला. काहीही झालं तरी रणजीत कासले हे पोलीस अधिकारी आहेत. ते खोटं बोलणार नाहीत. त्यांना एन्काउंटरची सुपारी दिली जाऊ शकते. हे एन्काउंटर करण्यासाठी देण्यात येणारी 5 कोटी रक्कम ही फार छोटी आहे. हे लोक 100 कोटीही देऊ शकतात, असंही यावेळी करुणा शर्मा यांनी म्हंटलं आहे. पुढे ते असेही म्हणाल्या, इथे सगळं राजकारण पैशांच्या जोरावरच चालू आहे. आज तुम्ही बघू शकता मोठ-मोठे कांड लोकांच्या समोर आलेले आहेत. वाल्मिक कराड तर एक मोहरा आहे. मात्र अनेक प्रकरणं पैशांच्या जोरावर दाबले जात आहेत, असा गंभीर आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
