PM at Kashi Vishwanath Mandir | काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा

PM at Kashi Vishwanath Mandir | काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा

| Updated on: Dec 13, 2021 | 1:53 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत डुबकी घेत गंगा स्नान केलं. यावेळी मोदींनी पुष्ण आणि जल अर्पण करत मनोभावे सूर्य देवाची पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत डुबकी घेत गंगा स्नान केलं. यावेळी मोदींनी पुष्ण आणि जल अर्पण करत मनोभावे सूर्य देवाची पूजा केली. तसेच पवित्र गंगेतील जल सोबतही घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणासी दौऱ्यावर आले आहेत. वाराणासी एअरपोर्टवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदिबेन पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं. वाराणासीत आल्यावर त्यांनी आधी नागरिकांना हात उंचावून नमस्कार केला. त्यानंतर मोदी थेट कालभैरव मंदिरात पोहोचले. काशीच्या कोतवाल कालभैरव मंदिरात येऊन त्यांनी पूजा अर्चना केली. या मंदिरात मोदी तब्बल 20 मिनिटे होते. यावेळी त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याशीही चर्चा केली.