शिवसेना-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही फुटणार? केसीआर राव यांच्या विधानाने चर्चांना उधाण
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर दौऱ्यावर असताना के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र सत्तानाट्यावर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
कोल्हापूर, 02 ऑगस्ट 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर दौऱ्यावर असताना के चंद्रशेखर राव यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षही फुटण्याच्या मार्गावर आहे, असं मोठं विधान के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
Latest Videos

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
