“22 वर्षांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूवर संशय?”, शिंदेंच्या शिवसेनेलाच कुणाचा सवाल
VIDEO | आनंद दिघे यांचं नाव घेऊन स्वार्थी राजकारण करू नका, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कुणी केलं आवाहन?
ठाणे : शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूची आठवण काढली आणि त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे भेटून गेल्यानंतर 30 मिनिटांनी आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. त्यावरूनच आता राजकारण तापले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारासाठी आम्ही बंडखोरी केल्याचेही म्हटले जात आहे. अशातच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मात्र आता जे पक्ष आनंद दिघे यांच्या नावावर राजकारण करतात त्यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या या वक्तव्यावरून केदार दिघे यांनी शिंदे गटालाच आता प्रतिसवाल उपस्थित करत आनंद दिघे यांच्या पश्चात आता अशा प्रकारचा संशय हा व्यक्त करण्यात येत आहे.
Published on: Apr 06, 2023 08:20 PM
Latest Videos