आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे उपस्थित होते की नव्हते? केदार दिघे यांनी स्पष्टच सांगितलं…
VIDEO | 'आनंद दिघे यांचा घातपात झाल्याचं विधान करणं चुकीचं', दिघे यांच्या निधनावरून राजकार तापलं
मुंबई, ३० जुलै २०२३ | आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे का गेले नव्हते? असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यावर केदार दिघे यांनी भाष्य करत टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘दिघे साहेबांबद्दल असे विधान करणे हे चुकीचं आहे. वारंवार असे विधान करून या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. दिघे साहेबांमुळे एवढ्या वर्ष सत्ता भोगली पद भोगली आणि आता अशा प्रकारचे विधान करून नक्की काय मिळवणार आहेत. दिघे साहेब गेल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे आल्या होत्या त्याचे माझ्याकडे पुरावे देखील आहेत. संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात ताण न मिळत असल्यामुळे अशा प्रकारचे विधान करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या नेत्यांवरती बोलायचं आणि आपल्या साहेबाला खुश करायचा असे धंदे त्यांनी लावून ठेवलेले आहेत. मी त्यांना अनेक वेळा बोललो आहे तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते तुम्ही द्या’, असे केदार दिघे यांनी म्हटले.