KEM Hospital Video | केईएम हॉस्पिटलमध्ये शेकडो नर्सेसचा ठिय्या, रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन

KEM Hospital Video | केईएम हॉस्पिटलमध्ये शेकडो नर्सेसचा ठिय्या, रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन

| Updated on: Nov 18, 2022 | 12:18 PM

रुग्णालय प्रशासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी  सुरु केली आहे. यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे.

मुंबईः मुंबईतील केईएम हॉस्पिटल (KEM Hospital) प्रशासनाविरोधात शेकडो परिचारिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. हॉस्पिटलबाहेरील जागेत शेकडो परिचारिका (Nurses Protest) एकत्र आल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी  सुरु केली आहे. यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. नर्स आणि वार्डबॉय यांनीही या आंदोलकांनी (Agitation) सहभाग नोंदवला आहे. येथील नर्सेसना नर्स क्वार्टर रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच टीबी रुग्णालयात स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले आहे. या स्थलांतराला नर्सेसचा विरोध आहे. त्यामुळे शेकडो परिचारिकांनी आज सकाळपासूनच रुग्णालयातील कामकाज ठप्प करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Published on: Nov 18, 2022 12:17 PM