Kochi News : धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
Employer Abused In Office : ऑफिसमध्ये दिलेल कामाचं टार्गेट पूर्ण केलं नाही, तर बॉस रागवतो, कायदेशीर कारवाई करतो. मात्र केरळमध्ये टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून कर्मचाऱ्याला भयंकर शिक्षा देण्यात आली आहे.
कार्यालयात देण्यात आलेलं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याचा चक्क कुत्रा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या कोचीमध्ये हा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
ऑफिसमध्ये दिलेलं टार्गेट कर्मचाऱ्याने पूर्ण केलं नाही म्हणून त्याला शिक्षा देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याच्या गळ्यात चक्क पट्टा बांधून त्याला कुत्रा बनवण्यात आलं आहे. तसंच याच अवस्थेत पूर्ण ऑफिसमध्ये फिरवण्यात देखील आलं आहे. अतिशय धक्कादायक आणि संतापजनक या प्रकाराच्या चौकशीचे आदेश आता राज्य कामगार विभागाने दिले आहे.
Published on: Apr 07, 2025 11:40 AM
Latest Videos
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!

