खेड बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; काय आहे नेमकं कारण?

खेड बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; काय आहे नेमकं कारण?

| Updated on: Apr 21, 2023 | 10:28 AM

सध्या ही बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून तेथे आमदार दिलीप मोहिते यांचा ताबा आहे. मात्र आता त्यांच्या हातातून ही खेड कृषी उत्पन्न बाजार समिती जाण्याची शक्यता आहे

खेड : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अनेक चेहरे रिंगणात आहेत. तर राजकिय पक्षांनिही शड्डू ठोकला आहे. यातच येथे महाविकास आघाडीला मात्र चांगले यश येईल असं दिसत नाही. कारण येथे मविआच्या आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. सध्या ही बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून तेथे आमदार दिलीप मोहिते यांचा ताबा आहे. मात्र आता त्यांच्या हातातून ही खेड कृषी उत्पन्न बाजार समिती जाण्याची शक्यता आहे. दिलीप मोहिते यांचे वर्चस्व कमी करण्यासह त्यांच्या हातातून खेड कृषी उत्पन्न बाजार समिती काढून घेण्यासाठी येथे भाजप आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. तर त्याला आता शिवसेना (शिंदे) आणि काँग्रेसची साथ मिळत आहे. त्यामुळे येथे मोहिते पाटील यांच्याविरुद्ध सर्व पक्षीय एकत्र आल्याचे दिसत आहे. सध्या दोन पॅनल आणि पॅनल विरहित असे 38 जण निवडणूक रिंगणात आहेत. तर 18 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात असल्याने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Published on: Apr 21, 2023 10:28 AM