Suresh Dhas : धसांना हरणाचं मांस पुरवलं? ‘बिश्नोईकडून माझ्या हत्येचा कट…’, सुरेश धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं मुंबईत आणली गेली आहेत आणि...
खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. एका पोर्टला सुरेश धसांना काल एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी खळबळ उडवून टाकणारा आरोप केला. तर पोलिसांकडून या प्रकरणी माहिती मिळाल्याचे सांगत धसांनी ट्वीव्ही ९ मराठीशी बोलताना याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘मी जे आरोप केलेत ते सत्य त्याची चौकशी व्हावी. पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली आहे. या प्रकरणी पत्र देणार आहे. खोक्या भोसले प्रकरणात त्या खोक्याच्या आडून सगळं सुरू आहे. तो माझा कार्यकर्ता असला तरी मी त्याला काही पाठिंबा दिला नाही. शिरूर आणि मुंबईत यासंदर्भात उपोषण करणं. बिश्नोई समाजात हरीण या प्राण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे यामध्ये माझं नाव जोडणं आणि विमानाची चार तिकीटं काढून राजस्थानातून बिश्नोई समाजाची लोकं मुंबईत बोलवायची. बिश्नोई समाजाकडून धसाचा काटा निघाला पाहिजे’, असं म्हणत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुरेश धसांनी केली.