'आधी लोकसभेच्या उमेदवारीचं बघा, नंतर विधानसभेचं बोला', उदय सामंतांच्या बंधूंना कुणी डिवचलं?

‘आधी लोकसभेच्या उमेदवारीचं बघा, नंतर विधानसभेचं बोला’, उदय सामंतांच्या बंधूंना कुणी डिवचलं?

| Updated on: Apr 05, 2024 | 2:27 PM

निलेश राणेंना ५० हजारांच्या फरकाने जिंकून आणू, असं वक्तव्य करत किरण सामंतांनी कुडाळ विधानसभेच्या जागेवरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना चॅलेज दिलंय. तर यावर वैभव नाईक यांनी पलटवार करत किरण सामंत यांना डिवचलं

नारायण राणे यांना विश्वासात घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा मागणार असल्याचे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी केलंय तर निलेश राणेंना ५० हजारांच्या फरकाने जिंकून आणू, असं वक्तव्य करत किरण सामंतांनी कुडाळ विधानसभेच्या जागेवरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना चॅलेज दिलंय. तर यावर वैभव नाईक यांनी पलटवार करत किरण सामंत यांना डिवचलं आहे. ‘निलेश राणेंना निवडून आणण्याआधी स्वतःच्या उमेदवारीसाठी किती प्रयत्न करावे लागतात. राणेंची किती लाचारी करावी लागते याचा अंदाज आहे. कोणाला तरी खूश करण्यासाठीं अस बोलाव लागतंय’, असं म्हणत वैभव नाईक यांनी खोचक टोला लगावला आहे. तर तुमची पैशाची ताकद कुडाळ मालवण मतदारसंघात चालणार नाही. आधी तुमच्या लोकसभेचे बघा नंतर विधानसभेचे बघू असेही म्हणत वैभव नाईक यांनी उदय सामंतांच्या बंधूंना एकप्रकारे डिवचल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Apr 05, 2024 02:26 PM