“अनिल परब मग ते साडेदहा कोटी रुपये कुठून आले?” किरीट सोमय्या यांचा इशारा; म्हणाले, “हिशोब तर घेणारच!”
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी हायकोर्टात खटला दाखल केल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.साई रिसॉर्टप्रकरणी माझी चौकशी केली. गेली दीड वर्षे माझी नाहक बदनामी करण्यात आली.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी हायकोर्टात खटला दाखल केल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.साई रिसॉर्टप्रकरणी माझी चौकशी केली. गेली दीड वर्षे माझी नाहक बदनामी करण्यात आली. आता आपली अब्रू जाईल या भितीने किरीट सोमय्यांनी ही याचिका मागे घेतली, असं अनिल परब म्हणाले. यावर किरीट सोमय्या यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “अर्धे रिसॉर्ट पाडण्यात आले आहे. राहिलेलंही पाडण्यात येणार आहे. एक जेलमध्ये आहे. दुसरा बेलवर आहे. सदानंद कदम तीन महिने झालं जेलमध्ये आहेत. तर, अनिल परब जामीनावर आहेत. हिशोब तर घेणारच”, असं किरीट सोमय्या म्हणाले. “अनिल परब उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही खर्च केलेले साडेदहा कोटी रुपये कुठून आले, याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आयकर विभागाने अनिल परब यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. परब निर्दोष आहेत, तर जामीनावर का सुटले?जेलमध्ये राहून सत्याग्रह करायचा होता. जो जेल आणि जामीनाच्यामध्ये आहे, त्याने निर्दोष असल्याचं सांगू नये,” असा टोला सोमय्यांनी परबांना लगावला आहे.