Special Report | वाईनवरून राजकीय आरोपांचा भडका!

Special Report | वाईनवरून राजकीय आरोपांचा भडका!

| Updated on: Jan 31, 2022 | 11:36 PM

राज्य सरकारकडून किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

कोणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किरीट सोमय्यांचा मुलगा चणे, शेंगदाणे विकतो का?, भाजपवाल्यांची (BJP) मुले केळी विकतात का?, अमित शहांचा (amit shah)मुलगा ढोकळा विकतो का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांना केला होता. त्यावर सोमय्या यांनी पलटवार केला आहे. कोण ढोकळा विकतो आणि कोण काय करतो ते सोडा. तुम्हाला वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते आधी सांगा, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तुमच्या कुटुंबात कधी कोणी उद्योग केला नाही. चोपड्यात एक दमडीही दिली नाही. मग अशोक गर्गन यांनी तुम्हाला पार्टनरशीप दिलीच कशी? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी देखील सोमय्या यांना जोरदार टोला लगावला आहे. मी तुमच्या घरापर्यंत आलो तर तुम्हाला महारष्ट्रच सोडावा लागेल असे राऊत यांनी म्हलटे आहे.