हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, Kirit Somaiya यांचं ठाकरे सरकारला आव्हान

हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, Kirit Somaiya यांचं ठाकरे सरकारला आव्हान

| Updated on: Jan 27, 2022 | 11:32 PM

मी वाट पाहतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे खुले आवाहन सोमय्यांनी ठाकरेंना दिलंय.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारवर टीका करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता किरीट सोमय्या मंत्रालयातील त्या फोटोवरून चर्चेत आलेत. किरीट सोमय्यांना बजावल्यावरू सोमय्या आक्रमक झाले आहेत. मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मी प्रताप सरनाईकांची फाईल बघायला मंत्रालयात गेलो, प्रताप सरनाईकांनी चोरी, लबाडीने बांधकाम केलं, त्यांना दंड माफ केला, ती फाईल बघायला मी चौथ्या मजल्यावर गेलो होतो असे सोमय्या छातीठोकपणे सांगत आहेत. तसेच त्यावेळी सरनाईकांना आत येण्यासाठी मुभा कशी दिली गेली? असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे. मी वाट पाहतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे खुले आवाहन सोमय्यांनी ठाकरेंना दिलंय.